Kokan: निवती येथे आंबा-काजू बागेला आग

0
30
निवती,vengurla,
निवती येथे आंबा-काजू बागेला आग

वेंगुर्ला प्रतिनिधी- निवती येथे ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला.https://sindhudurgsamachar.in/kokan-रस्ता-बंद-मुळे-पर्यटन/

      कुडाळ येथील भाई शिरसाठ यांची निवती येथे आंबा कलमांची बाग आहे. या बागेमध्ये ३५० आंबा कलम आहेत. तर त्यांच्या बाजूलाच श्री. ठाकूर यांची २०० काजू कलम असलेली बाग आहे. या बागेला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली ती विझवण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे अग्निशमन दल पोहचले आणि शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आग विझविली. यावेळी वाहन चालक गणेश जाधवफायरमन नरेश परब,  कर्मचारी पंकज पाटणकरदेवेंद्र जाधव सहभागी झाले होते.

फोटोओळी – आंबा काजू बागेमधील आग वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी विझविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here